IMF: लसीकरण ते पुरवठा समस्ये मुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम

IMF च्या ऑक्टोबर २०२१ च्या वर्ल्ड आऊटलूक अहवाल च्या आधारावर  covid लसीकरण,  ,चलन वाढ ,जागतिक पुरवठ्याच्या समस्या यांचा जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम यावर लिहिलेला दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांचा लेख...

IMF दरवर्षी दोन वेळा एप्रिल व ऑक्‍टोबर मध्ये जागतिक आउटलुक अहवाल सादर करते. या अहवालात एकंदरीत जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये दिशा स्पष्ट केली जाते. ऑक्टोबर २०२१  चा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला त्यानुसार 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर world GDP ५.९% एवढी होती तर पुढच्या वर्षी जागतिक विकासाचा दर हा २०२२ वर्ल्ड GDP ४.९% एवढा राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे .म्हणजेच या वर्षी पेक्षा पुढच्या वर्षी जागतिक आर्थिक विकासाचा दर हा एक टक्क्याने कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारताचा जीडीपी विकासाचा दर 2020 मध्ये _ 7.3 टक्के होता, 2021 मध्ये हा दर 9.5% तर पुढच्या वर्षी 2022 मध्ये 8.5% राहण्याची शक्यता आहे. चीन सोबत तुलना केल्यास चीन पुढच्या वर्षी 2022 मध्ये जीडीपी विकासाचा दर 5.6 टक्के असणार आहे त्यामुळे चीनच्या तुलनेत भारताचा विकासाचा दर अधिक असेल ही एक सुखावणारी बाब म्हणता येईल.
2022 मध्ये जागतिक विकासाचा दर _ 2.3 टक्के असेल, प्रगत देशांमध्ये 0.9 टक्के विकसनशील देशांमध्ये _ 5.5 टक्के चीनमध्ये _ 2.1, कमी उत्पन्न गटामध्ये  देशात _ 6.7 टक्के. असेल असे IMF च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे
लसीकरण व जागतिक अर्थव्यवस्थेला गती..
लसीकरणामुळे आर्थिक गतिविधि ला सुरळीत करण्यासाठी सर्वात महत्त्वाची मदत ठरू शकते.कोविडमुळे पुढच्या पाच वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेला 5.3 मिलीयन डॉलर्स चे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Covid मुळे जगात 50 लाख पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. लसीकरण हा जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा सुरळीत आणण्याचा महत्त्वाचा उपाय होय. पण सद्यस्थितीत जागतिक स्तरावर लसीकरणाचा विचार करतात अजूनही खूप मोठा मैलाचा टप्पा पार करावयाचा आहे. प्रगत देशांमध्ये दोन डोस घेतलेल्या चे प्रमाण 60 टक्के एवढे आहे तर कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये केवळ चार टक्केच लोकसंख्येला लसीकरण करण्यात आले आहे.
IMF नुसार 2021 पर्यंत 40 टक्के लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण म्हणजेच दोन डोस पूर्ण होणे आवश्यक आहे . 2022 च्या मध्यापर्यंत 70 टक्के लोकसंख्या ला जर आपण दोन डोस देऊ शकलो तर याचा अर्थ व्यवस्थेला गती देण्यासाठी व ती सुरळीत करण्यासाठी मदत होईल.
भारतातील लसीकरण
21 ऑक्टोबर २०२१ रोजी भारताने शंभर कोटी  लस देण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. जानेवारीमध्ये लसीकरण प्रारंभ करत असताना 31 लाख डोस दिले गेले होते, दहा महिन्यात शंभर कोटी डोस पूर्ण करण्यात आले. 31.4 टक्के वयस्क व्यक्तींना(१८ वर्षावरील) दोन डोस देण्यात आले.७५.७% वयस्क लोकसंख्येला एक डोस देण्यात आले. देशात सिक्किम ८९.६७%, लडाख 71. 22 टक्के, गोवा  67.22 टक्के, लक्षदीप ६६.१४%, मिझोरम ५७.६०% लसीकरण करून ही राज्य अव्वल क्रमांकावर आहेत.
देशात तमिळनाडू 25.2 मेघालय 24. 93 बिहार 21. 3 झारखंड 19. 83 उत्तर प्रदेश 18.88 ही राज्य सर्वात कमी लसीकरणाची राज्य ठरली आहेत.
जागतिक पुरवठासाखळी मंदावल
 Covid  मुळे जगात आर्थिक उत्पादनाच्या क्षेत्रात पुरवठ्याची साखळी मंदावली आहे त्यामुळे उत्पादनावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात सोबतच उपभोक्ता बाजारात वस्तूंच्या पुरवठ्यावर सुद्धा विपरीत परिणाम झाल्यामुळे त्याचे परिणाम हे किंमतवाडी मध्ये चलनवाडीत पहावयास मिळतात. अमेरिका जर्मनी यासारख्या विकसित देशांमध्ये सुद्धा पुरवठ्याच्या साखळीमधील समस्येमुळे वस्तूंच्या किमती वाढल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील ला पोर्ट या बंदरावर अलीकडे मोठ्या प्रमाणात मालवाहू जहाज नी गर्दी केल्याचे दिसून आले .अमेरिकेच्या राष्ट्रपतीला ही बंदरे चोवीस बाय सात अशी अहोरात्र काम करून ही पुरवठ्याची साखळी पुन्हा सुरळीत करण्यात येईल अशी घोषणा करावी लागेल.
गरीब देशांमध्ये प्रामुख्याने अन्नधान्याच्या किंमती वाढ हि मंद पुरवठ्याच्या साखळीमुळे  दिसून आले. अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे सामाजिक स्तरावर चिंतेचे सावट गरीब राष्ट्रांत दिसून येत आहे.
भारतात गेल्या दीड वर्षात पेट्रोलच्या किमती 36 रुपये प्रति लिटर वाढल्या तर डिझेलच्या किमती 26 रुपये 58 पैशांनी वाढल्या. या सर्वाचा परिणाम चलनवाढीवर होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चलनाचा पुरवठा वाढवण्यासाठी आय एम एफ ने 650 अब्ज डॉलर्स SDR उपलब्ध करून दिले आहेत.
स्थानिक पातळीवर मध्यवर्ती बँकांनी आपल्या मौद्रिक धोरणांमध्ये शिथीलता आणून अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा पुरवठा वाढ होणे आवश्यक आहे जेणेकरून उत्पादन संस्था उद्योगांना लिक्विडिटी ची समस्या राहणार नाही.
सध्या करोणाच्या परिस्थितीतून मार्ग काढताना लसीकरण हा सर्वात महत्त्वाचे उपाय होय श्रीमंत राष्ट्र सोबतच गरीब देशासाठी शंभर कोटी डोस आगामी काळात उपलब्ध करून दिले जाणार असले तरी जोपर्यंत पूर्ण लसीकरण होणार नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही लसीकरणाच्या अभावामुळे गरीब देशात हा संसर्ग पुन्हा होत राहील ज्याचा परिणाम एकंदरीत करोणाच्या पुनर्प्रसारण व अर्थव्यवस्थेवर पडत राहील....
...
दीपक कदम
 प्रमुख आंबेडकरवादी मिशन
९३२६९३२०४९,९३७०७५३०५९.

Popular posts from this blog

दीपक कदम यांना मी ' साहेब म्हणतो..... डॉ.भालचंद्र मुणगेकर

T 15 ... कॉलरवाली माताराम वाघीण.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऐश्वर्या चिकटे या महाराष्ट्रातून पाहिल्या बौद्ध /अनु जाती मुलीची शिक्षणासाठी निवडलातूर येथील ऐश्वर्या आशा सुशील चिकटे या विद्यार्थिनीची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झालेली ही पहिली मुलगी होय. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीचा पाया शिक्षण असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (१९१६_२१) काळामध्ये अर्थशास्त्राचे सर्वोच्च शिक्षण घेतले त्याच विद्यापीठामध्ये ऐश्वर्या चिकटे ही विद्यार्थिनी Msc economics history या विषयात पदवीत्तर पदवी चे शिक्षण घेण्यासाठी निवडल्या गेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्यंतिक अभिमानाची ची बाब असल्याचे आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दिपक कदम यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षात महाराष्ट्रातून अनुसूचित जातीतून एकही विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकण्यासाठी गेला नाही. विशेषता मुलींचा विचार करता महाराष्ट्रातून अनुसूचित जाती/बौद्ध समाजातून विचार करता ऐश्वर्या ही पहिली मुलगी आहे जी याठिकाणी उच्चशिक्षणासाठी जात आहे ही बाब सर्वांसाठी भूषण होय व मुलींसमोर हा एक आदर्श होय. दीपक कदम यांच्या हस्ते याप्रसंगी ऐश्वर्या चिकटे चा भव्य सत्कार करण्यात आला. सुशील चिकटे हे आज लातूरमध्ये यशस्वी उद्योजक असले तरी अत्यंत विपरित परिस्थितीतून प्रसंगी मोलमजुरी करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे .लातूरमध्ये ते यशस्वी उद्योजक आहेत व सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रियपणे स्वतःचे योगदान देतात.बारावी सायन्स नंतर परंपरागत मेडिकल किंवा इतर क्षेत्रात शिक्षण न घेता दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुण्यामध्ये अर्थशास्त्राची पदवी संपादित केली आणि आपले ध्येय ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या संकल्प केला जो आज पूर्णत्वास येत आहे.सिद्धार्थ नगर लातूर येथे ऐश्वर्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला याप्रसंगी युपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवले सुमित धोत्रे रँक ६६०व निलेश गायकवाड६२९ यांच्या वडिलांचा प्राचार्य श्रीकांत गायकवाड सर व दत्ता हरी धोत्रे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भंते पन्यानंद, इंजिनीयर शिवाजी सोनकांबळे, प्रा. अविनाश नाईक, लताबाई महादेव चिकटे ,पद्मिनी बाई नामदेव सावंत ,आशा सुशील चिकटे ,मनोरमा संजय चिकटे प्रा. दुष्यंत कठारे, अनिरुद्ध बनसोडे, एडवोकेट सुनील कांबळे, भारत कांबळे सुधाकर कांबळे श्रीकांत गायकवाड, सुकेशनी सरोदे, सिद्धार्थ सोसायटी महिला मंडळातर्फे ललिता गायकवाड, सुमन ढोबळे सुनील श्रंगारे ,अर्चना जाधव ,पंचशीला सुरवसे ,पद्मिनी कांबळे सुदामती भालेराव ,वीर मला गोधने ,तब्बू मीरा मस्के, मीना चिकटे सिद्धांत ,श्रुती अर्चना, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.