लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऐश्वर्या चिकटे या महाराष्ट्रातून पाहिल्या बौद्ध /अनु जाती मुलीची शिक्षणासाठी निवडलातूर येथील ऐश्वर्या आशा सुशील चिकटे या विद्यार्थिनीची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झालेली ही पहिली मुलगी होय. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीचा पाया शिक्षण असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (१९१६_२१) काळामध्ये अर्थशास्त्राचे सर्वोच्च शिक्षण घेतले त्याच विद्यापीठामध्ये ऐश्वर्या चिकटे ही विद्यार्थिनी Msc economics history या विषयात पदवीत्तर पदवी चे शिक्षण घेण्यासाठी निवडल्या गेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्यंतिक अभिमानाची ची बाब असल्याचे आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दिपक कदम यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षात महाराष्ट्रातून अनुसूचित जातीतून एकही विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकण्यासाठी गेला नाही. विशेषता मुलींचा विचार करता महाराष्ट्रातून अनुसूचित जाती/बौद्ध समाजातून विचार करता ऐश्वर्या ही पहिली मुलगी आहे जी याठिकाणी उच्चशिक्षणासाठी जात आहे ही बाब सर्वांसाठी भूषण होय व मुलींसमोर हा एक आदर्श होय. दीपक कदम यांच्या हस्ते याप्रसंगी ऐश्वर्या चिकटे चा भव्य सत्कार करण्यात आला. सुशील चिकटे हे आज लातूरमध्ये यशस्वी उद्योजक असले तरी अत्यंत विपरित परिस्थितीतून प्रसंगी मोलमजुरी करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे .लातूरमध्ये ते यशस्वी उद्योजक आहेत व सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रियपणे स्वतःचे योगदान देतात.बारावी सायन्स नंतर परंपरागत मेडिकल किंवा इतर क्षेत्रात शिक्षण न घेता दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुण्यामध्ये अर्थशास्त्राची पदवी संपादित केली आणि आपले ध्येय ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या संकल्प केला जो आज पूर्णत्वास येत आहे.सिद्धार्थ नगर लातूर येथे ऐश्वर्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला याप्रसंगी युपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवले सुमित धोत्रे रँक ६६०व निलेश गायकवाड६२९ यांच्या वडिलांचा प्राचार्य श्रीकांत गायकवाड सर व दत्ता हरी धोत्रे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भंते पन्यानंद, इंजिनीयर शिवाजी सोनकांबळे, प्रा. अविनाश नाईक, लताबाई महादेव चिकटे ,पद्मिनी बाई नामदेव सावंत ,आशा सुशील चिकटे ,मनोरमा संजय चिकटे प्रा. दुष्यंत कठारे, अनिरुद्ध बनसोडे, एडवोकेट सुनील कांबळे, भारत कांबळे सुधाकर कांबळे श्रीकांत गायकवाड, सुकेशनी सरोदे, सिद्धार्थ सोसायटी महिला मंडळातर्फे ललिता गायकवाड, सुमन ढोबळे सुनील श्रंगारे ,अर्चना जाधव ,पंचशीला सुरवसे ,पद्मिनी कांबळे सुदामती भालेराव ,वीर मला गोधने ,तब्बू मीरा मस्के, मीना चिकटे सिद्धांत ,श्रुती अर्चना, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

लातूर येथील ऐश्वर्या आशा सुशील चिकटे या विद्यार्थिनीची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झालेली ही पहिली मुलगी होय. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीचा पाया शिक्षण असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (१९१६_२१) काळामध्ये अर्थशास्त्राचे सर्वोच्च शिक्षण घेतले त्याच विद्यापीठामध्ये ऐश्वर्या चिकटे ही विद्यार्थिनी Msc economics history या विषयात पदवीत्तर पदवी चे शिक्षण घेण्यासाठी निवडल्या गेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्यंतिक अभिमानाची ची बाब असल्याचे आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दिपक कदम यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षात महाराष्ट्रातून अनुसूचित जातीतून एकही विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकण्यासाठी गेला नाही. विशेषता मुलींचा विचार करता महाराष्ट्रातून अनुसूचित जाती/बौद्ध समाजातून विचार करता ऐश्वर्या ही पहिली मुलगी आहे जी याठिकाणी उच्चशिक्षणासाठी जात आहे ही बाब सर्वांसाठी भूषण होय व मुलींसमोर हा एक आदर्श होय. दीपक कदम यांच्या हस्ते याप्रसंगी ऐश्वर्या चिकटे चा भव्य सत्कार करण्यात आला. सुशील चिकटे हे आज लातूरमध्ये यशस्वी उद्योजक असले तरी अत्यंत विपरित परिस्थितीतून प्रसंगी मोलमजुरी करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे .लातूरमध्ये  ते यशस्वी उद्योजक आहेत व सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रियपणे स्वतःचे योगदान देतात.
बारावी सायन्स नंतर परंपरागत मेडिकल किंवा इतर क्षेत्रात शिक्षण न घेता दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुण्यामध्ये अर्थशास्त्राची पदवी संपादित केली आणि आपले ध्येय ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या संकल्प केला जो आज पूर्णत्वास येत आहे.
सिद्धार्थ नगर लातूर येथे ऐश्वर्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला याप्रसंगी युपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवले सुमित धोत्रे  रँक ६६०व निलेश गायकवाड६२९ यांच्या वडिलांचा  प्राचार्य श्रीकांत गायकवाड सर व दत्ता हरी धोत्रे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भंते पन्यानंद, इंजिनीयर शिवाजी सोनकांबळे, प्रा. अविनाश नाईक, लताबाई महादेव चिकटे ,पद्मिनी बाई नामदेव सावंत ,आशा सुशील चिकटे ,मनोरमा संजय चिकटे प्रा. दुष्यंत कठारे, अनिरुद्ध बनसोडे, एडवोकेट सुनील कांबळे, भारत कांबळे सुधाकर कांबळे श्रीकांत गायकवाड, सुकेशनी सरोदे, सिद्धार्थ सोसायटी महिला मंडळातर्फे ललिता गायकवाड, सुमन ढोबळे सुनील श्रंगारे ,अर्चना जाधव ,पंचशीला सुरवसे ,पद्मिनी कांबळे सुदामती भालेराव ,वीर मला गोधने ,तब्बू मीरा मस्के, मीना चिकटे सिद्धांत ,श्रुती अर्चना, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Popular posts from this blog

दीपक कदम यांना मी ' साहेब म्हणतो..... डॉ.भालचंद्र मुणगेकर

आंबेडकरवादी मिशन मध्ये निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग