दीपक कदम यांना मी ' साहेब म्हणतो..... डॉ.भालचंद्र मुणगेकर

आंबेडकरवादी मिशन ला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. भालचंद्र मुणगेकर.
दिपक कदम हे माझ्यापेक्षा वयाने  माझा पेक्षा खूप लहान आहेत पण मी त्यांना साहेब म्हणतो, मी मुळात wप्राध्यापक असल्यामुळे मी कोणालाही सहाजा सहजी साहेब म्हणत नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांना साहेब म्हणले जाते . पण तहसीलदार पदाचा त्याग करून सर्वसामान्य कामगार  यांच्या सहकार्याने नांदेड येथे आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राची भव्य यंत्रणा उभी करून तीनशे विद्यार्थ्यांना निवासाची स्पर्धात्मक अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून दिली आहे, ही त्यांची प्रत्यक्ष कृती आत्यंतिक महत्त्वपूर्ण आहे म्हणून  मी त्यांना कृतज्ञता पूर्वक साहेब म्हणतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरा वर अनेक लोक भाषणे करतात अनेक लोक बोलतात पण प्रत्यक्ष कृती फार कमी लोक करतात त्यामध्ये दीपक कदम यांचा समावेश आहे त्यांनी कृतीमधून ही यंत्रणा उभी करून संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीची यंत्रणा सरकारच्या किंवा राजकीय मदतीविना उभारू शकतो याचे एक यशस्वी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
           दिल्लीमध्ये प्लॅनिंग कमिशनचे सदस्य असताना दीपक कदम यांची दिल्लीत 2008 ,2009 मध्ये दोन वेळा भेट झाल्याचे मला आठवते. Rule by pen and brain हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश समोर ठेवून दीपक कदम प्रत्यक्ष कृती द्वारे तरुणांची पिढी घडवत आहेत.
अत्तराचा सुगंध घेण्यासाठी  नाकाजवळ हाताला जवळ न्याव  लागतं तर गटाराची दुर्गंधीही दुरून येते त्याप्रमाणे दिपक कदम हे आपल्या समाजातील अत्तराचा फाया होय त्यांच्याजवळ गेल्यावरच त्यांच्या कार्याची महती स्पष्ट होते..
दिवसाच्या प्रारंभापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण कधीच निगेटिव्ह विचार करत नाही असे याप्रसंगी डॉ. मुणगेकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या यशाचे गमक सांगताना स्पष्ट केले.
इयत्ता नववी पर्यंत इंग्रजी येत नव्हते पण पुढे आपण इंग्रजीमध्ये व सर्व विषयात आपल्या शाळेतून प्रथम आल्याचे विद्यार्थ्यांना सांगून मी असा जगलो हे आपले दहावीपर्यंतचे आत्मचरित्र सर्व विद्यार्थ्यांनी वाचावे असे डॉ. मुंनगेकर यांनी स्पष्ट केले .इंग्रजी सुधारण्यासाठी दररोज एक तास लिखान व बोलण्याचा सराव करा याशिवाय इंग्लिश एररस ऑफ  इंडियन स्टुडन्ट हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचावे असे याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना सुचित केले.
 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 15000 पानांची लिखाण वाचण्यासाठी आपणास सात वर्षाचा वेळ लागला त्या आधारावर आपण इसेन्स ऑफ आंबेडकर हा ग्रंथ लिहिला त्याचे आठवी आवृत्ती सध्या प्रकाशित करण्यात आली आहे तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मला पूर्ण समजले असा दावा मी करू शकत नाही एवढी महान विद्वत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असल्याचे त्यांनी याप्रसंगी विनय पूर्वक नमूद केले. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकमेव पुतळा आहे.कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन विद्यापीठांमधून अर्थशास्त्राची पीएचडी व डीएससी घेणारे ते जगातील एकमेव विद्यार्थी आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श विद्यार्थ्यांनी समोर ठेवावा आणि आंबेडकरवादी मिशन मध्ये उभारलेल्या यंत्रणेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केलें.
आगामी काळात आपण मिशन केंद्रात येऊन  दिवस विद्यार्थ्यांमध्ये राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू असे आश्‍वासन त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिले.
आंबेडकरवादी या सर्वोच्च सामाजिक पुरस्काराने डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांचा गौरव याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी केला. 
याप्रसंगी शिवाजी सोनकांबळे, दत्ताहरी धोत्रे ,अविनाश नाईक ,प्रा. कैलास राठोड , शेषराव वाघमारे,नदा वाघमारे ,अलका गायकवाड ,नितीन एगडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
दिनांक 18 डिसेंबर २०२१.
स्थळ आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र..(विद्यार्थ्यांना मार्गदर्शन)
डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर 
माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ .
माजी खासदार राज्यसभा .
माजी सदस्य नियोजन आयोग.

Popular posts from this blog

आंबेडकरवादी मिशन मध्ये निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऐश्वर्या चिकटे या महाराष्ट्रातून पाहिल्या बौद्ध /अनु जाती मुलीची शिक्षणासाठी निवडलातूर येथील ऐश्वर्या आशा सुशील चिकटे या विद्यार्थिनीची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झालेली ही पहिली मुलगी होय. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीचा पाया शिक्षण असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (१९१६_२१) काळामध्ये अर्थशास्त्राचे सर्वोच्च शिक्षण घेतले त्याच विद्यापीठामध्ये ऐश्वर्या चिकटे ही विद्यार्थिनी Msc economics history या विषयात पदवीत्तर पदवी चे शिक्षण घेण्यासाठी निवडल्या गेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्यंतिक अभिमानाची ची बाब असल्याचे आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दिपक कदम यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षात महाराष्ट्रातून अनुसूचित जातीतून एकही विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकण्यासाठी गेला नाही. विशेषता मुलींचा विचार करता महाराष्ट्रातून अनुसूचित जाती/बौद्ध समाजातून विचार करता ऐश्वर्या ही पहिली मुलगी आहे जी याठिकाणी उच्चशिक्षणासाठी जात आहे ही बाब सर्वांसाठी भूषण होय व मुलींसमोर हा एक आदर्श होय. दीपक कदम यांच्या हस्ते याप्रसंगी ऐश्वर्या चिकटे चा भव्य सत्कार करण्यात आला. सुशील चिकटे हे आज लातूरमध्ये यशस्वी उद्योजक असले तरी अत्यंत विपरित परिस्थितीतून प्रसंगी मोलमजुरी करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे .लातूरमध्ये ते यशस्वी उद्योजक आहेत व सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रियपणे स्वतःचे योगदान देतात.बारावी सायन्स नंतर परंपरागत मेडिकल किंवा इतर क्षेत्रात शिक्षण न घेता दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुण्यामध्ये अर्थशास्त्राची पदवी संपादित केली आणि आपले ध्येय ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या संकल्प केला जो आज पूर्णत्वास येत आहे.सिद्धार्थ नगर लातूर येथे ऐश्वर्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला याप्रसंगी युपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवले सुमित धोत्रे रँक ६६०व निलेश गायकवाड६२९ यांच्या वडिलांचा प्राचार्य श्रीकांत गायकवाड सर व दत्ता हरी धोत्रे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भंते पन्यानंद, इंजिनीयर शिवाजी सोनकांबळे, प्रा. अविनाश नाईक, लताबाई महादेव चिकटे ,पद्मिनी बाई नामदेव सावंत ,आशा सुशील चिकटे ,मनोरमा संजय चिकटे प्रा. दुष्यंत कठारे, अनिरुद्ध बनसोडे, एडवोकेट सुनील कांबळे, भारत कांबळे सुधाकर कांबळे श्रीकांत गायकवाड, सुकेशनी सरोदे, सिद्धार्थ सोसायटी महिला मंडळातर्फे ललिता गायकवाड, सुमन ढोबळे सुनील श्रंगारे ,अर्चना जाधव ,पंचशीला सुरवसे ,पद्मिनी कांबळे सुदामती भालेराव ,वीर मला गोधने ,तब्बू मीरा मस्के, मीना चिकटे सिद्धांत ,श्रुती अर्चना, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.