कंधार येथे नागा बिहार निर्मिती म्हणजेच प्राचीनतम राष्ट्रकूट काळातील बौद्ध इतिहासाची पुनर्निर्मिती होय ___मान.किशोर कांबळे उपविभागीय पोलिस अधीक्षक.
कंधार
नागा विहाराची निर्मिती म्हणजे राष्ट्रकूट काळातील प्राचीनतम बौद्ध इतिहासाची ही पुनर्निर्मिती असल्याचे मान.किशोर कांबळे उपविभागीय पोलिस अधीक्षक यांनी मत व्यक्त केले .संभाजी केरबाजी कदम यांनी आपल्या 82 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वडिलोपार्जित शेती , घर विहार निर्मिती ,विपश्यना कक्ष, ग्रंथालय व अभ्यासिका यासाठी दान दिली होत . फुलेनगर कंधार येथील आत्यंतिक महत्त्वाच्या शहरातील सहा गुंठे जागेवर हे विशाल नागा विहार उभारण्यात येणार आहे. कदम कुटुंबीयांतर्फे उभारण्यात येणाऱ्या या विहाराच्या नामफलकाचे उद्घाटन मान.किशोर कांबळे डीवायएसपी यांच्या हस्ते संपन्न झाले .याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी कदम परिवाराच्या वतीने या विहारांची निर्मिती केली जाईल व युनिव्हर्सल बुद्धिस्ट संघ तर्फे या विहारा देखरेख व धम्मकार्य संपन्न होईल असे स्पष्ट केले, याशिवाय आंबेडकरवादी मिशन ग्रंथालय व अभ्यासिका विद्यार्थ्यांना निशुल्क या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल वेळोवेळी तज्ञ मार्गदर्शक व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपलब्ध केले जाईल .सोबतच विपश्यना कक्ष हा कंधार परिसरातील विपस्सी साधकांसाठी नियमित ध्यानासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे .सार्वजनिक कार्यक्रमासाठी निशुल्क सभाग्रह सुद्धा याठिकाणी भविष्यात उपलब्ध असेल असे याप्रसंगी दीपक कदम यांनी स्पष्ट केले.राष्ट्रकूट काळामध्ये बाराशे वर्षापूर्वी कंधारमध्ये 9 प्राचीनतम विहारे होतील सध्या त्यांचे अवशेष कंधार परिसरात विखुरलेल्या अवस्थेत आहेत .बाराशे शतकांपूर्वी सापडलेली बुद्ध मूर्ती ही बुद्ध प्रवेशद्वारा जवळील बौद्ध विहारांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. त्यावर कोरलेल्या बुद्धाच्या धम्मदेशना सारनाथ येथील धमेक स्तूपा वरील कोरलेल्या धम्म देशाने ची प्रतिलिपी होय. फुलेनगर प्रवेशद्वारात सम्राट अशोकाची मूर्ती सापडली आहे ही एक महत्त्वाची इतिहासिक ठेव आहे हा प्राचीन इतिहास वारसा पुढे नेण्यासाठी नागा विहार क्रतसंकल्प असेल असे या प्रसंगी दीपक कदम यांनी स्पष्ट केले .यूपीएससी परीक्षेत भविष्य संपादन करणारे सुमित धोत्रे rank ६६० यांच्या वडील दत्ता हरी धोत्रे यांचा याप्रसंगी भव्य सत्कार करण्यात आला.