जागतिक भूक निर्देशांकात भारत 101 क्रमांकावर...27% कुपोषणाचे अर्थसंकल्पीय तरतूद कमी. भारत गंभीर भूक समस्येच्या गटात समावेश.

दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी जागतिक भूक निर्देशांक व भारतातील भूक ची समस्या, शासनाची भूमिका यावर लिहिलेला हा विश्लेषणात्मक लेख.
........
जागतिक भूक निर्देशांक२०२१  (ग्लोबल हंगर इंडेक्स २०२१)चा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला ,त्यानूसार भारत 116 देशाच्या यादीमध्ये 101 व्या क्रमांकावर आहे. शंभर गुणाच्या श्रेणीत भारतास २७.५ एवढे गुण या निर्देशांकात आहेत व भारत हा गंभीर भूक समस्येच्या देशाच्या गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.भारत सरकारची पहिली प्रतिक्रिया, हे निर्देशांक तयार करण्याची पद्धती अशास्त्रीय असून भारतात अशा प्रकारचे भूक समस्या नसल्याचे शासनाने स्पष्ट केले. 
जर्मनीचे संस्था organisation welt hunger Hilfe आणि आयरिश संस्था concern world wide यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजेच जागतिक भूक बळीचे निर्देशांक व त्याचा अहवाल दरवर्षी सादर केल्या जातो. या वर्षी 136 देशांची आकडेवारी जमा करण्यात आली व 116 देशा चा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार सर्वात कमी भुकेची समस्या असलेल्या 0 ते 5 गुणांच्या गटामध्ये 18 देशाचा समावेश आहे यामध्ये बेलारूस, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, ब्राझील ,चीन चिली इत्यादी देशांचा पहिल्या पाच मध्ये समावेश आहे तर सर्वात शेवटचा क्रमांक 116 वा सोमालिया चा आहे. हा निर्देशांक तयार
निर्देशांक तयार करण्यासाठी चार निकष
निर्देशांक तयार करण्यासाठी चार प्रकारचे निकष समोर ठेवण्यात आले आहेत त्यामध्ये कुपोषण, पाच वर्षापेक्षा कमी बालकांची त्यांच्या वयापेक्षा कमी उंची (child stunting), पाच पेक्षा कमी वयाच्या बालकांचे त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी वजन (child wasting), बालक मृत्यू दर पाच वर्षाच्या खालील मुलांचे
वरील चार निकषाच्या आधारावर हा निर्देशांक 0 ते 100 गुणांचा असतो. 0 ते ९.९ गुण हे अत्यंतिक कमी समस्येचे, दहा ते 19.9 मध्यम, २० ते ३४.९ गंभीर, ३५ ते ४९.९ धोकेदायक, ५० गुणांच्या वर अत्यंत गंभीर भूक बळी ची समस्या असलेले देश अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
भारताची भूक निर्देशांकाची स्थिती गंभीर
2019 च्या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत 116 देशांच्या यादीत 101 व्या क्रमांकावर आहे गतवर्षी भारत 94 व्या क्रमांकावर होता गेल्यावर्षीपेक्षा भारताची भूक समस्या गंभीर झाली आहे. या वर्षी भारताच्या निर्देशांकातील गुण 27.5 एवढे आहेत, 2000 मध्ये भारताचे गुण 38.8 ,2006मध्ये 37.4 ,2012 मध्ये 28.8, 2021 मध्ये सतत 27.5 असे गुण कमी कमी होत जाताना पहावयास मिळतात.
भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान 92 व्या क्रमांकावर ,बांगलादेश 76 ,नेपाळ 76, म्यानमार 71 म्हणजेच भारतापेक्षा वरील रस्त्यांचे भूक ची स्थिती उत्तम असल्याचे स्पष्ट होते. भारतानंतर केवळ पंधराच देश या यादीत उरतात यावरून आपल्या देशाची भूक समस्या स्पष्ट होते.
भारत सरकारचा दावा
भारत सरकारने जागतिक भूक निर्देशांक तयार करण्याची पद्धती ही अशास्त्रीय आहे व फोन वरील माहितीच्या आधारावर ती तयार करण्यात आली आहे असा आरोप केला आहे पण प्रत्यक्षात जागतिक भूक निर्देशांक तयार करणाऱ्या संस्थेने भारताची आकडेवारी जमा करत असताना खालील पैकी स्त्रोत वापरल्याचे आपल्या अहवालामध्ये स्पष्ट केले आहे त्यानुसार 12 जुलै 2019 रोजी प्रकाशित झालेला fAO फोटो सेक्युरिटी इंडिकेटर २०२१ चा अहवाल हा कुपोषणाच्या आकडेवारीसाठी, युनिसेफ जागतिक बँक जागतिक आरोग्य संघटनेचे अहवाल हे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या वजन व उंचीच्या अहवालासाठी, इंडिया कॉम्प्रिहेन्शन नॅशनल न्यूट्रिशन सर्वे 2016 18 नॅशनल रिपोर्ट 2019 माल न्यूट्रिशन इस्टिमेट पब्लिक २९२१ या अहवालांचा आधार घेऊन वरील आकडेवारी जमा करून त्याचे विश्लेषण करून हा निर्देशांक तयार करण्यात आल्याचे वरील संस्थेने स्पष्ट केले आहे
अर्थसंकल्पात कुपोषणा वरील तरतूद कमी करण्यात आली
निर्मला सीतारामन यांनी 2०२१ चा अर्थसंकल्प सादर करत असताना गतवर्षीपेक्षा 27 टक्के कुपोषणाच्या साठी ची तरतूद कमी केली आहे. गत अर्थसंकल्पात ही तरतूद 3700 कोटीची होती ती या वर्षीच्या अर्थसंकल्पात 2700 कोटी एवढी कमी म्हणजे 27 टक्के कमी करण्यात आली आहे या अर्थसंकल्पात देशातील 112 जिल्ह्यामध्ये विशेषता मिशन पोषण ही योजना राबवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असले तरी अर्थसंकल्पीय तूट कमी करून भारत सरकार हे महिला व बालकांच्या कुपोषणाच्या समस्या सोडविण्याच्या संदर्भात किती गंभीर आहे हे यावरून स्पष्ट होते. भारतात 35 टक्के मुले ही त्यांच्या वयाच्या नुसार कमी उंचीची, तेहतीस टक्के मुले ही वयाच्या तुलनेत कमी वजनाची आहेत. कुपोषणामुळे लहान मुलांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होतोय या सोबतच त्यांच्या बौद्धिक विकासाला सुद्धा मर्यादा येतात त्यामुळे भारतातील 40 टक्के लोकसंख्या ही सर्वसाधारणतः कार्य करण्यासाठी बौद्धिक दृष्ट्या सक्षम राहत नाही असे जागतिक बँकेच्या एका अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे अशा गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकार आहे गंभीर नसल्याचे स्पष्ट होते.
Oxfam या संस्थेच्या अहवालानुसार जगात प्रति मिनिटाल
 अकरा व्यक्ती हे भूक बळी ठरत आहेत ही अत्यंतिक महत्त्वाची मानवीय त्रासदी होय.
...
दीपक कदम
 प्रमुख आंबेडकरवादी मिशन
०९३२६२९२०४९
०९३७०७५३०५९

Popular posts from this blog

दीपक कदम यांना मी ' साहेब म्हणतो..... डॉ.भालचंद्र मुणगेकर

T 15 ... कॉलरवाली माताराम वाघीण.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऐश्वर्या चिकटे या महाराष्ट्रातून पाहिल्या बौद्ध /अनु जाती मुलीची शिक्षणासाठी निवडलातूर येथील ऐश्वर्या आशा सुशील चिकटे या विद्यार्थिनीची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झालेली ही पहिली मुलगी होय. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीचा पाया शिक्षण असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (१९१६_२१) काळामध्ये अर्थशास्त्राचे सर्वोच्च शिक्षण घेतले त्याच विद्यापीठामध्ये ऐश्वर्या चिकटे ही विद्यार्थिनी Msc economics history या विषयात पदवीत्तर पदवी चे शिक्षण घेण्यासाठी निवडल्या गेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्यंतिक अभिमानाची ची बाब असल्याचे आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दिपक कदम यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षात महाराष्ट्रातून अनुसूचित जातीतून एकही विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकण्यासाठी गेला नाही. विशेषता मुलींचा विचार करता महाराष्ट्रातून अनुसूचित जाती/बौद्ध समाजातून विचार करता ऐश्वर्या ही पहिली मुलगी आहे जी याठिकाणी उच्चशिक्षणासाठी जात आहे ही बाब सर्वांसाठी भूषण होय व मुलींसमोर हा एक आदर्श होय. दीपक कदम यांच्या हस्ते याप्रसंगी ऐश्वर्या चिकटे चा भव्य सत्कार करण्यात आला. सुशील चिकटे हे आज लातूरमध्ये यशस्वी उद्योजक असले तरी अत्यंत विपरित परिस्थितीतून प्रसंगी मोलमजुरी करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे .लातूरमध्ये ते यशस्वी उद्योजक आहेत व सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रियपणे स्वतःचे योगदान देतात.बारावी सायन्स नंतर परंपरागत मेडिकल किंवा इतर क्षेत्रात शिक्षण न घेता दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुण्यामध्ये अर्थशास्त्राची पदवी संपादित केली आणि आपले ध्येय ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या संकल्प केला जो आज पूर्णत्वास येत आहे.सिद्धार्थ नगर लातूर येथे ऐश्वर्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला याप्रसंगी युपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवले सुमित धोत्रे रँक ६६०व निलेश गायकवाड६२९ यांच्या वडिलांचा प्राचार्य श्रीकांत गायकवाड सर व दत्ता हरी धोत्रे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भंते पन्यानंद, इंजिनीयर शिवाजी सोनकांबळे, प्रा. अविनाश नाईक, लताबाई महादेव चिकटे ,पद्मिनी बाई नामदेव सावंत ,आशा सुशील चिकटे ,मनोरमा संजय चिकटे प्रा. दुष्यंत कठारे, अनिरुद्ध बनसोडे, एडवोकेट सुनील कांबळे, भारत कांबळे सुधाकर कांबळे श्रीकांत गायकवाड, सुकेशनी सरोदे, सिद्धार्थ सोसायटी महिला मंडळातर्फे ललिता गायकवाड, सुमन ढोबळे सुनील श्रंगारे ,अर्चना जाधव ,पंचशीला सुरवसे ,पद्मिनी कांबळे सुदामती भालेराव ,वीर मला गोधने ,तब्बू मीरा मस्के, मीना चिकटे सिद्धांत ,श्रुती अर्चना, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.