CM दलित तर PM दलित का नको .......................... पंजाबात नवनियुक्त दलित मुख्यमंत्री आणि आंबेडकरवादी चळवळ


25 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेत शेवटचे भाषण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय समते सोबत आर्थिक लोकशाही व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते, आणि हे उद्दिष्ट प्राप्त करण्याची जबाबदारी कायदे मंडळावर टाकण्यात आली होती यासाठी भारतीय संविधानाचा प्रभावशाली पणे वापर करण्याच्या सूचना डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी दिल्या होत्या
.स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर पंजाब मध्ये चरणजीत चन्नी या दलित नेत्याची (रामदासी सिख) ची नियुक्ती काँग्रेसने मुख्यमंत्रीपदी करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. भारतात 28 राज्यात व आठ पैकी तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये म्हणजेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून 31 ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहेत त्यापैकी केवळ एका राज्याचे मुख्यमंत्री अनुसूचित जाती प्रवर्गातून नियुक्त करण्यात आले आहेत. 
भारत स्वातंत्र्याचे 75 वें वर्ष साजरी करत आहे असताना केवळ गॅस कनेक्शन मोफत देऊन किंवा स्वच्छालय उभारून अंत्योदय होणार नाही तर  देशाचा पंतप्रधान अनुसूचित जाती प्रवर्गातून व्हायला हवा अनेक राज्यातून अनुसूचित जाती जमातीतील नेते मुख्यमंत्रीपदी कार्यरत हवेत.
राजकीय तज्ञांच्या मतानुसार अकाली व बहुजन समाज पार्टीच्या युतीमुळे आगामी विधानसभेवर होणाऱ्या परिणामांना टाळण्यासाठी काँग्रेसने एक डावपेचाचा भाग म्हणून दलित मुख्यमंत्री देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी आंदोलनामध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात दलित शिख सहभाग आहे, त्यांची मते कॉंग्रेस कडे वळविण्याचा हा प्रयत्न होय. पंजाब विधानसभेमध्ये 117 जागा आहेत त्यापैकी बत्तीस ते पन्नास जागेवर अनुसूचित जाती चे मतदार निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतात. पंजाब मध्ये उच्चवर्णीय जाट शिख प्रमाण 25 टक्के तर अनुसूचित जाती चे प्रमाण 32 टक्के आहे.
पंजाबात आंबेडकरवादी चळवळ
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंजाब मध्ये शेड्युल कास्ट फेडरेशन च्या माध्यमातून सक्रिय राजकीय चळवळ अस्तित्वात होती. 1951 च्या निवडणुकीत शेड्युल कास्ट फेडरेशन 19 जागा लढवून 98 हजार 268 एवढी मते व (१.९७ टक्के) मते घेतली होती. 1957 मध्ये शेड्युल कास्ट फेडरेशन ने 24 विधानसभेच्या जागा लढवून पाच जागेवर विजय प्राप्त केला होता 410३६४  मते (५.४०%) घेतली होती.RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा नेतृत्वाखाली १९६७ (१.७९%),१९६९(१.०९%),१९७२(०.२१%) १९७७ (०.०९%) एवढी मते पंजाब मध्ये मिळवली होती. source..ASRC & ..election commission.
शेड्युल कास्ट फेडरेशन ने 1957 मध्ये पाच आमदार पंजाब मधून निवडून आणले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने १९ ६७ मध्ये तीन आमदार निवडून आणले होते.
गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय अस्पृश्यांचे खरे नेते आहेत या संदर्भामध्ये देशभरातून जेवढ्या तारा पाठवण्यात आल्या त्यापैकी सर्वाधिक 14 हजार पेक्षा जास्त तार इंग्लंड ला पंजाब मधून पाठवण्यात आल्या होत्या.
येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची इतिहासिक घोषणा केल्यानंतर त्यांना आपल्या धर्मात येण्या संदर्भात विनंती अनेक धर्मगुरूंनी केली होती त्यामध्ये ख्रिश्चन, शिख धर्म गुरूंचा समावेश होत. पण हिंदू धर्मातील जातीयता व विषमतेचा संसर्ग अनेक धर्मांमध्ये त्यांना पहावयास मिळाल्यामुळे त्यांनी अखेर समतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.'ख्रिश्चनाझींग  द अनटचेबल्स अँड कंडिशन ऑफ द कन्व्हर्ट या अप्रसिद्ध निबंधात त्यांनी ख्रिश्चन धर्मातील जातीय तेचा समाचर घेतला होता. गांधींनी बाबासाहेबांना शीख धर्माचा पर्याय सुचवला होता,सुवर्ण मंदिराच्या संचालकांनी सुद्धा बाबासाहेबांना तार पाठवून शीख धर्मात येण्याचे आमंत्रण दिले होते ,शिखांच्या एका भजनाच्या कार्यक्रमात 13 जानेवारी 1936 रोजी बाबासाहेब उपस्थित होते 1९३6 शिख मिशन परिषदेला सुद्धा ते उपस्थित होते. एका शिष्टमंडळाला सुद्धा त्यांनी पंजाब मध्ये पाठवून शीख धर्माचा अभ्यास करून धर्मगुरूंना भेटण्यासाठी पाठवले होते. पण शेवटी शिख धर्मात सुद्धा जातीयतेचा संसर्ग पहावयास मिळाल्यामुळे त्यांनी शीख धर्मात जाण्याचे टाळले.
पंजाबमध्ये 32 टक्के अनुसूचित जातीतील लोकसंख्या असली तरी ती अनेक उपजाती मध्ये विभागल्या गेली आहे यात प्रामुख्याने मजहब शिख २६.३३%, रामदासी सिक २०.७३%, अद धर्मीय१०.१७% वाल्मिकी ८.६६% असे त्यांचे सर्वसाधारण ता विभाजन होते.
ग्रामीण भागातील गुरुद्वार यामध्ये बऱ्याच ठिकाणी  संत रविदास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पहावयास मिळतात पण अनेक ग्रामीण भागातील गुरुद्वारत अजून दलितांना प्रवेश दिला जात नाही त्यामुळे अनेक ठिकाणी दलितांनी स्वतःचे स्वतंत्र गुरुद्वारे व डेरे उभारले आहेत. 1 ऑक्टोबर १८७३ ला अमृत्सर मध्ये सिंग सभेची स्थापना ज्ञानि दिल सिंह , प्रोफेसर गुरुमुख सिंह, भाई जवाहर सिंह यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती ,याचा मूळ उद्देश हा सिख धर्मा मधील धार्मिक सुधारणा करून समता प्रस्थापित करणे हा होता .पण ज्ञानी दित्त सिंह यांचा मुलगा डॉक्टर बलदेव सिंह यांनी जातीयतेच्या प्रश्नावरून पुढे ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पंजाब मध्ये 1932 मध्ये सुरू झालेले आम ध्रम आंदोलन, गुरुद्वारा प्रबंधक समितीमध्ये दलितांना घेण्याच्या प्रश्नावरून 2003 मध्ये जालंधर या ठिकाणी झालेल्या दंगली, 2009 मध्ये वियना ऑस्ट्रिया मध्ये गुरुद्वारात उच्चवर्णीय पुजाऱ्याची झालेली हत्या व त्यानंतर पंजाब मध्ये उसळलेल्या दंगली वरील सर्व बाबी पाहता हिंदू धर्मातील अस्पृश्यतेच संसर्ग शीख धर्मात सुद्धा पहावयास मिळतो.
कांशीरामजी बीएसपी  व पंजाब
पंजाब मधील खवासपूर जिल्हा रोपड या ठिकाणी जन्मलेले कांशीराम यांनी आंबेडकरी आंदोलनामध्ये बी एस पी च्या माध्यमातून आम्ही शासन करते होऊ शकतो हा विश्वास प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये निर्माण केला. कांशीराम हे अनुसूचित जातीतील रामदासी   शिख होते पण त्यांचा अंत्यविधी हा भिक्खू संघाच्या उपस्थित बौद्ध पद्धतीने झाला होता. 1992 मध्ये बीएसपी ने नऊ आमदार निवडून आणले होते व १६.३२% मते घेतली होती ही त्यांची पंजाबमधील सर्वोच्च कामगिरी. मागील २०१७  च्या विधानसभा निवडणुकीत बी एस पी ने 111 जागा लढवून केवळ१.52% मते मिळवली होती पण अलीकडे अकाली व बी एस पी यांच्यात झालेल्या युती मुळे आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसवर याचा विपरीत परिणाम लक्षात घेता तो टाळण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दलित चेहरा मुख्यमंत्री चेनि यांच्या माध्यमातून पुढे केला आहे.
ÇM दलीत तर PM सुद्धा दलित हवा
स्वातंत्र्याची 75 वी वर्षगाठ साजरी करत असताना देशात अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तीला पंतप्रधान का करू नये असा प्रश्न अनेक  च्या मनात येत आहे त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी यासंदर्भात नक्कीच विचार करावा.
.....
दीपक कदम 
प्रमुख आंबेडकरवादी मिशन दिल्ली.

Popular posts from this blog

दीपक कदम यांना मी ' साहेब म्हणतो..... डॉ.भालचंद्र मुणगेकर

T 15 ... कॉलरवाली माताराम वाघीण.

आंबेडकरवादी मिशन मध्ये निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग