संभाजी केरबाजी कदम : आधुनिक अनाथपिंडक




संभाजी कदम: आधुनिक अनाथपिंडक
विहार , ध्यान कक्ष ,ग्रंथालय व अभ्यासिका निर्मितीसाठी स्वतःचे घर व शेती जमीन समाजासाठी अर्पण 
कंधार जिल्हा नांदेड.

बुद्धकालीन अनाथपिंडका नें सोन्याच्या मोहरा अंथरूण जेतवण विहाराची निर्मिती केली होती , तोच आदर्श समोर ठेवून आधुनिक काळात संभाजी केरबाजी कदम फुलेनगर कंधारकर यांनी आपली वडिलोपार्जित सर्व संपत्ती, शेती, स्वतःचे घर समाजासाठी विहार निर्मिती ,ध्यान कक्ष ,ग्रंथालय व अभ्यासिका निर्मितीसाठी दान देण्याचे जाहीर केले, त्यांच्या८२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वरील संकल्प जाहीर केला. करोनाच्या  काळात  सत्ता ,संपत्ती, प्राण हे क्षणभंगुर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे त्यामुळे आपली सर्व मालमत्ता शेती संपत्ती घर हे समाज उपयोगी आले पाहिजे या उद्देशाने संभाजी केरबाजी कदम यांनी वरील घोषणा केली.  पत्नी सावित्रीमाई, चार मुली व एक मुलगा यांच्या उपस्थितीमध्ये व उपस्थित समाजबांधवांच्या समोर आंबेडकरवादी मिशन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्या शेतजमिनीवर आगामी काळामध्ये नागा विहार ची निर्मिती करण्यात येणार आहे त्यामध्ये विपश्यना कक्ष ग्रंथालय व अभ्यासिका ची प्रामुख्याने उभारणी केली जाईल व या सर्व सुविधा विद्यार्थी व समाज बांधवांना निशुल्क पणे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विहार उभारणीचा खर्च सिडको नांदेड येथे त्यांच्या स्वकष्टाने उभारलेल्या दोन घराच्य विक्रीतून आलेल्या पैशातून केले जाणार आहे, त्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील मुली जावई नातवंडे हे सर्व मिळून जे अकरा अधिकारी डॉक्टर इंजिनियर आहेत त्यांच्या वेतनातून दिल्या जाणाऱ्या दानातून हे विहार फक्त कदम कुटुंबियांच्या निधीवर उभारले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये कुष्ठतंत्रज्ञ म्हणून आपली सेवा प्रामाणिकपणे बजावल्यानंतर गेल्या पंचवीस वर्षा पूर्वी सेवानिवृत्त झाले.. सिडको परिसरामध्ये संत कबीर नगर या परिसरात वास्तव्य करत असताना चंद्रमुनी बुद्धविहाराचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन वीस वर्षापूर्वी अल्प काळामध्ये विहाराची निर्मिती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला होता.. आत्यंतिक शांत शीतल  स्वभावाचे शील व करुणा यांचा अद्वितीय संगम असलेले हे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्व परिचित आहेत.
बाप से बेटा सवाई अशी एक म्हण आहे पण मुलापेक्षा आपण त्याग व समर्पण मध्ये एक पाऊल सुद्धा कमी नाही हे त्यांनी या निर्णयातून जाहीर केले. आंबेडकरवादी मिशनच्या निर्मितीसाठी व समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना अधिकारी करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या माननीय दीपक कदम यांचे ते वडील आहेत. दीपक कदम यांनी आजीवन अविवाहित राहून तहसीलदार पदाचा त्याग करून समाजासमोर समर्पणाचा एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.वडिलांनी सुद्धा आपली सर्व शेती संपत्ती घर समाजाला अर्पण करून समाजासमोर आधुनिक अनाथपिंडिकाच्या ची भूमिका बजावत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
संभाजी कदम व दीपक कदम यांनी आपल्या नावावर वैयक्तिक शेती जमीन संपत्ती बँक बॅलेंस न ठेवता संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण करण्याचा हा आदर्श समाजातील धम्म चळवळ शैक्षणिक चळवळ राजकीय चळवळ राबवणाऱ्या समोर एक दीपस्तंभ आहे तर विद्यार्थी व तरुणांसमोर हे एक ज्वलंत त्यागाच व समर्पणाचे उदाहरण आहे त्याचे अनुकरण केल्यास नक्कीच सामाजिक राजकीय व धम्माची चळवळ गतिमान होण्यास हातभार लागेल.
आंबेडकरवादी मिशन च्या निर्मितीसाठी दीपक कदम यांच्या मोठ्या भगिनी आयु . करुणा रामदास तारु यांनी जमीन दान दिली होती त्यावरच आज ५00 विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था असलेले आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र उभारण्यात आले आहे.

 त्याग व समर्पण साठी कदम कुटुंबीयांचे उदाहरण हे समाजासमोर एक आदर्श म्हणून पाहिल्या जाते. समाजासाठी स्वतःची संपत्ती व एकुलता एक मुलगा दान देण्याचे हे एक अद्वितीय असे आदर्श उदाहरण होय.

Popular posts from this blog

दीपक कदम यांना मी ' साहेब म्हणतो..... डॉ.भालचंद्र मुणगेकर

T 15 ... कॉलरवाली माताराम वाघीण.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऐश्वर्या चिकटे या महाराष्ट्रातून पाहिल्या बौद्ध /अनु जाती मुलीची शिक्षणासाठी निवडलातूर येथील ऐश्वर्या आशा सुशील चिकटे या विद्यार्थिनीची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झालेली ही पहिली मुलगी होय. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीचा पाया शिक्षण असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (१९१६_२१) काळामध्ये अर्थशास्त्राचे सर्वोच्च शिक्षण घेतले त्याच विद्यापीठामध्ये ऐश्वर्या चिकटे ही विद्यार्थिनी Msc economics history या विषयात पदवीत्तर पदवी चे शिक्षण घेण्यासाठी निवडल्या गेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्यंतिक अभिमानाची ची बाब असल्याचे आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दिपक कदम यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षात महाराष्ट्रातून अनुसूचित जातीतून एकही विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकण्यासाठी गेला नाही. विशेषता मुलींचा विचार करता महाराष्ट्रातून अनुसूचित जाती/बौद्ध समाजातून विचार करता ऐश्वर्या ही पहिली मुलगी आहे जी याठिकाणी उच्चशिक्षणासाठी जात आहे ही बाब सर्वांसाठी भूषण होय व मुलींसमोर हा एक आदर्श होय. दीपक कदम यांच्या हस्ते याप्रसंगी ऐश्वर्या चिकटे चा भव्य सत्कार करण्यात आला. सुशील चिकटे हे आज लातूरमध्ये यशस्वी उद्योजक असले तरी अत्यंत विपरित परिस्थितीतून प्रसंगी मोलमजुरी करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे .लातूरमध्ये ते यशस्वी उद्योजक आहेत व सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रियपणे स्वतःचे योगदान देतात.बारावी सायन्स नंतर परंपरागत मेडिकल किंवा इतर क्षेत्रात शिक्षण न घेता दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुण्यामध्ये अर्थशास्त्राची पदवी संपादित केली आणि आपले ध्येय ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या संकल्प केला जो आज पूर्णत्वास येत आहे.सिद्धार्थ नगर लातूर येथे ऐश्वर्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला याप्रसंगी युपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवले सुमित धोत्रे रँक ६६०व निलेश गायकवाड६२९ यांच्या वडिलांचा प्राचार्य श्रीकांत गायकवाड सर व दत्ता हरी धोत्रे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भंते पन्यानंद, इंजिनीयर शिवाजी सोनकांबळे, प्रा. अविनाश नाईक, लताबाई महादेव चिकटे ,पद्मिनी बाई नामदेव सावंत ,आशा सुशील चिकटे ,मनोरमा संजय चिकटे प्रा. दुष्यंत कठारे, अनिरुद्ध बनसोडे, एडवोकेट सुनील कांबळे, भारत कांबळे सुधाकर कांबळे श्रीकांत गायकवाड, सुकेशनी सरोदे, सिद्धार्थ सोसायटी महिला मंडळातर्फे ललिता गायकवाड, सुमन ढोबळे सुनील श्रंगारे ,अर्चना जाधव ,पंचशीला सुरवसे ,पद्मिनी कांबळे सुदामती भालेराव ,वीर मला गोधने ,तब्बू मीरा मस्के, मीना चिकटे सिद्धांत ,श्रुती अर्चना, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.