आंबेडकरवादी मिशन ....महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ...८ मार्च २०२१ नोट्स.
8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनी महाराष्ट्राचा २०२१ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला.
आरोग्य विभागा अंतर्गत संस्था चे बांधकाम व श्रेणी वर्धन करण्यासाठी पुढील चार वर्षात 7 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
राज्य शासनाने आरोग्य आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली संचालक नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती नव्याने केली आहे.
औंध येथील जिल्हा रुग्णालय परिसरात राज्याचे अद्यावत संसर्गजन्य आजार रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे
24 तासात ऍन्जिओग्राफी करण्यासाठी राज्यातील आठ मध्यवर्ती ठिकाणी कार्डियाक क्यथ क्लब स्थापन करण्यात येणार आहे.
150 ठिकाणी कर्करोग निदान केंद्र स्थापन करण्यात येते
सिंधुदुर्ग उस्मानाबाद नाशिक रायगड सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहेत
अमरावती परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येईल
नवीन वैद्यकीय महाविद्यालय मुळे पदवी स्तरावर 1990 तर पदव्युत्तर स्तरावर 1000 व विशेषज्ञांच्या दोनशे जगा मध्ये वाढ होणार आहे
ग्रँट महाविद्यालय मुंबई आणि बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात येणार आहे.
अकरा शासकीय परिचर्या या विद्यालयाचे रूपांतर महाविद्यालयात करून त्यांना वैद्यकीय महाविद्यालयांना जोडण्यात येणार आहे .
सतरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना जोडून भौतिकोपचार व व्यवसाय उपचार महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे.
करोणा संसर्ग मधून बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी फुपुस यकृत मूत्रपिंडाच्या व मानसिक तणावाच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय शिक्षण संस्थेची नवीन इमारत बांधली जाणार आहे
ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे वर्ग-4 कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
सांगली जिल्हा रुग्णालयात तसेच आटपाटी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करण्यात येणार आहे.
अन्न व औषध प्रशासनास कायद्याची प्रशिक्षण देण्यासाठी मोशी जिल्हा पुणे येथे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
..
केवळ कृषी क्षेत्र 11.7 टक्के एवढा विकासदर प्राप्त करण्यात आला .
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना सुरू करण्यात आले.
तीन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात 2019 पासून शून्य टक्के व्याजाने कर्ज पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
थकीत वीज बिलाचे शेतकऱ्यांना तेहतीस टक्के सूट देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी उर्वरित थकबाकीचे पन्नास टक्के रकमेचा भरणा मार्च 22 पर्यंत केल्यास त्यांना पन्नास टक्के रकमेची अतिरिक्त माफी दिली जाईल.
विकेल ते पिकेल या धोरणांतर्गत बाजारपेठा विकसित करण्यात येतील यासाठी, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबवण्यात येणार आहे
महाराष्ट्र ॲग्रो बिझनेस नेटवर्क प्रकल्प मॅग्नेट येणार आहे त्याचा लाभ फळे व भाजीपाला उत्पादक लहान व सीमांत शेतकऱ्यांना मिळेल.
अमरावती जिल्ह्यात वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्री प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे 62 एकर जागेवर साइट्रस इस्टेट मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.
500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्यात येणार आहेत.
शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी महाडीबीटी पोर्टल ची स्थापना करण्यात येणार आहे.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे त्या अंतर्गत गाय व म्हशीचा पक्का गोटा बांधण्यासाठी शेळीपालन कुक्कुट पालनाचे शेड बांधण्यासाठी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
नाबाड तर्फे फिशरीज अँड एक्वा कल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड निर्माण करण्यात येणार आहे.
रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात चिकलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र विकसित करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत 26 कामे महाराष्ट्रात हाती घेण्यात आली आहेत.
बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे डिसेंबर 20२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्य धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे यात अंतर्गत 12 धरणांचे बळकटीकरण व सुधारणा यासाठी 624 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
इंदापूर व बारामती तालुक्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रात बंद नलिकेद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी _निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे.
कोबडी वडे महाराष्ट्रात राज्यस्तर उत्पादनात आठ टक्क्यांची घट झाली आहे.
माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम 44 टक्के पूर्ण झाले आहे 701 किलोमीटर लांबीच्या या रस्त्या पैकी पाचशे मी किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून नागपूर ते शिर्डी हा मार्ग महाराष्ट्र दिन 1 मे 2019 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी जालना जिल्हा ना जोडण्यासाठी नांदेड ते जालना हा दोनशे किलोमीटर लांबीचा सात हजार कोटी रुपये खर्चाचा द्रुतगती मार्ग तयार करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग साडेदहा किलोमीटर लांबीचा दोन भुयारी मार्ग तसेच दोन किलो मिटर लांबीचे दोन मुलाचा यात समावेश आहे हे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची क्षमता वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरेल असा कोकण विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा रेवस ते सिंधुदुर्ग हा 540 किलोमीटर लांबीचा सागरी महामार्ग उभारण्यात येणार आहे.
पुण्या बाहेरून चक्राकार मार्ग रिंग रोड 170 किलोमीटर लांबीचा 26 हजार किलोमीटर कोटी रुपये अंदाजित किमतीचा आठ पदरी उभारण्यात येणार आहे. यामुळे पुण्यातून होणारे वाहतुकीची कोंडी दूर होईल.
एकूण तीन लाख तीन हजार 842 किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करण्यात आले आहे.
आशियाई विकास बँकेचे अर्थसहाय्यातून ५६८९ कोटी चे रस्ते बांधकाम हाती घेण्यात आले आहे.
पुणे नाशिक या मध्यम अतिजलद रेल्वेमार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे दोनशे पस्तीस किलोमीटर लांब पुणे अहमदनगर नाशिक एकूण चोवीस स्टेशन यात प्रस्तावित आहेत. दोनशे किलोमीटर प्रतितास एवढा वेग याचा असेल.
नागपूर मेट्रोला नागपूर शहर वर्धा रामटेक भंडारा रोड नरखेड ही शहरे जोडण्यासाठी ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन चे 269 किलोमीटरचे काम प्रस्तावित आहे.
नाशिक शहरामध्ये ते 30 किलो मिटर लांबीचे काम नागपूर मेट्रो न्यू प्रकल्पाअंतर्गत.
ठाणे शहरासाठी वर्तुळाकार मेट्रो
पिंपरी चिंचवड ते निगडी साठी कॉरिडॉर एक हा प्रकल्प.
बीड ते परळी ,वर्धा ते यवतमाळ ते नांदेड नागपूर आणि इतवारी ते नागभिड हे रेल्वेचे काम वेगाने सुरू आहे.
शिर्डी विमानतळावर रात्रीच्या उड्डाणासाठी मनोरा तयार करण्यात येत आहे.
अमरावती जिल्ह्यात बेलोरा येथे विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तार व रात्रीच्या वाहतुकीची सुविधा प्रगतीपथावर आहे.
सोलापूर शहराजवळ बोरामणी येथे ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळावर विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे.
पुणे येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे.
शिवनी अकोला येथे नवीन धावपट्टी तयार करण्यात येणार आहे.
उजळाईवाडी कोल्हापूर येथे विमानतळाची धावपट्टी तयार करण्यात येणार आहे.
रमाई घरकुल योजना शबरी घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 22 हजार 924 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
इयत्ता बारावी पर्यंत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने स्टार्स योजना महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे यासाठी 976 कोटी रुपयांची खर्च अपेक्षित आहे.
देशातील पहिली सैनिकी शाळा 1961 मध्ये सातारा येथे स्थापन करण्यात आली याच्या विकासासाठी 300 कोटी रुपये प्रस्तावित आहेत.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क 50 कोटी रुपये खर्चून वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी महसुली मुख्यालयात मध्ये जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवण्यात येईल.
नेहरू सेंटर मुंबई आधुनिकीकरणासाठी दहा कोटीची तरतूद.
अमरावती येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था च्या शतकपूर्ती साठी दहा कोटी रुपये तरतूद.
मुंबईतील मुलुंड येथील कुणबी समाज उनती संघाच्या विद्यार्थी वस्तीग्रह साठी पाच कोटी रुपयांची तरतूद.
.