आंबेडकरवादी मिशन: संविधानिक मूल्यावर आधारित दशकातील आदर्शवत संस्थात्मक चळवळ..
आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राच्या दशकाच्या वाटचालीवर व भविष्यातील योजना संदर्भात लिहिलेला प्रा. अविनाश नाईक यांचा लेख....
माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा हाती घेऊन ,Rule by pen and brain हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरण्यासाठी आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र गेल्या दशकापासून एक संस्थात्मक चळवळ म्हणून नांदेड व दिल्ली या ठिकाणी कार्यरत आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या चळवळी ह्या स्ट्रीट फाईट नसून ती एक ब्रेन वार आहे हे दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन सातत्याने सांगत असतात. प्रशासनातील मारायच्या आणि मोक्याच्या जागा हाती घेण्यासाठी नांदेड येथे मुख्यालय असलेल्या आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र दिल्ली येथे ही कार्यरत आहे. मागील दोन दशकापासून हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे.
तहसीलदार म्हणून 2 वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर दीपक कदम यानी आपल्या पदाचा राजीनामा देऊन, अविवाहित राहून सामाजिक कार्यात स्वतःला समर्पित करणारे महाराष्ट्रातील ते अलीकडील काळातील एक आदर्श उदाहरण होय.
अशोका सामाजिक संशोधन केंद्र
Asrc म्हणजेच अशोका सोशल रिसर्च सेंटर च्या माध्यमातून 19 फेब्रुवारी 2004 रोजी समाजातील विविध शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक ,राजकीय समस्या वर उपायात्मक संशोधन व अंमलबजावणी करण्यासाठी चे कार्य दीपक कदम यांनी प्रारंभ केले.
14 एप्रिल 2006 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला व पूर्णवेळ शैक्षणिक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यास प्रारंभ केला.
अठरा तास अभ्यास उपक्रम
एक एप्रिल ते 14 एप्रिल २००६ च्या दरम्यान , अठरा तास अभ्यास उपक्रम सामाजिक स्तरावर राबवण्यासाठी दीपक कदम यांनी महाराष्ट्रात राज्यव्यापी अभियान चालवले .यादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे बहुतांश सर्व जिल्हे अनेक सामाजिक संस्था शाळा कॉलेजेस यांना भेटी दिल्या. अठरा तास अभ्यास उपक्रम जयंतीदिनी साजरा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासात्मक अभिवादन करण्याचा अभिनव उपक्रम समाजासमोर ठेवला. हा उपक्रम सामाजिक स्तरावर अनेक संस्था शाळा कॉलेज विद्यापीठांमधून राबवला गेला .अनेक जयंती मंडळाने स्वतःहून पुढाकार घेऊन अठरा तास अभ्यास उपक्रम आपापल्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने प्रत्यक्ष कृतीमध्ये आणला.
तत्कालीन शिक्षण संचालक मान. डॉ.गोविंद नांदेड, समाज कल्याण आयुक्त ई . झेड. खोब्रागडे यांनी त्यांच्या स्तरावर शाळा कॉलेज, समाज कल्याण चे होस्टेल या ठिकाणी अठरा तास अभ्यास उपक्रम राबवण्याचा संदर्भात आदर्शवत सूचना केल्या त्यामुळे शासकीय स्तरावर सुद्धा हा उपक्रम स्वीकृत झाला.
2006 व 2007 या दोन वर्षे राज्यव्यापी अभियानानंतर २००८ २००९ या वर्षी देशव्यापी अठरा तास अभ्यास अभियान दीपक कदम यांनी राबवले. भारतातील दीडशेपेक्षा अधिक विद्यापीठांना त्यांनी भेट दिली, 22 पेक्षा जास्त राज्यांना भेटी देऊन तेथील सामाजिक संघटना विद्यार्थी संघटना जयंती मंडळ प्रेस मीडिया या सर्वांच्या सहकार्याने देशव्यापी अठरा तास अभ्यास उपक्रम यशस्वीपणे राबवला.
विद्यार्थ्यांमध्ये उच्चशिक्षणाची व कठोर अभ्यासाची प्रेरणा निर्माण करावी, शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे बहुजन समाजातील विद्यार्थी हा उच्चशिक्षित व्हावा यासाठी प्रेरणा म्हणून जयंती च्या दिनी परंपरागत पद्धतीने ती साजरी न करता प्रत्यक्ष कृतीद्वारे अभ्यासात्मक अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा अभूतपूर्व असा उपक्रम संपूर्ण देशभरात राबवण्यात आला.
अधिष्ठान दिन
६ डिसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अधिष्ठान दिन (वज्र संकल्प दिन ) म्हणून विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस स्मरण करून शिक्षण अर्धवट सोडून जाणार नाही किमान पदवीपर्यंत शिक्षण घेईल अशी शपथ देण्याचा हा उपक्रम पण महाराष्ट्रात संपूर्ण राज्यभर राबविण्यात आला
घर तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका
घराघरात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरणादायी वातावरण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका प्रत्येक घरात स्थापन करावी अशी संकल्पना दीपक कदम यांनी जाहीर केली. घरात बेडरुम डायनिंग रूम हॉल सजवणे पेक्षा घराघरात प्राधान्याने अभ्यासिका व ग्रंथालय उभारावे, संयुक्तपणे घरातील सर्व कुटुंबीयांनी तेथे अभ्यास करावा जेणेकरून पुढील पिढीला अभ्यासाची उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळेल असा हा उपक्रम राबविण्यात आला. डॉक्टर कैलास देशमुख (मराठा समाजातील)यांच्या घरी पहिल्या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले, यासाठी दीपक कदम यांनी पुढाकार घेतला.
आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र
1 जानेवारी 2010 रोजी आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राच्या निर्मिती सिडको नांदेड परिसरात प्रारंभ करण्यात आली. आयु. करुणाताई तारू यांनी दिलेल्या जमिनीच्या दानावर मिशन केंद्राची निर्मिती प्रारंभ झाली.संपूर्ण राज्यात मिशनचा संदेश पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी दैनिक वृत्तरत्न सम्राट चे संपादक माननीय बबन कांबळे यांनी उचलले. बांधकामासाठी इंजिनियर प्रकाश नगरे यांनी पुढाकार घेतला. एका वर्षात 1 जानेवारी 2011 रोजी आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राची काम पूर्ण करून लोकार्पण करण्यात आले. दहा वर्षात सातत्यपूर्वक काम करून आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राची भव्य इमारत उभी आहे. संपूर्ण देशासाठी सर्वसामान्य समाजाने उभारलेली हे पहिले आदर्शवत केंद्र ठरले आहे.
प्रारंभी केवळ दोन अभ्यासिका ,एक शिकवणी कक्ष, मुलींसाठी वस्तीगृहात 12 रूम व आठ टॉयलेट बाथरूम अशी यंत्रणा 2011 मध्ये होती आज 2021 मध्ये५३ रूम, ८० टॉयलेट बाथरूम, आठ अभ्यासिका, तीन शिकवणी कक्षा, अत्याधुनिक डिजिटल उपग्रह प्रक्षेपण शिकवणी कक्ष, सुसज्ज ग्रंथालय, मेस इत्यादी तीनशे विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था उभारण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील बहुजन वर्गातील गरीब विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी साठी आंबेडकरवादी मिशन मध्ये प्रवेश घेऊन मोठ्या प्रमाणावर अधिकारी म्हणून यशस्वी होत आहेत.
2012 मध्ये दिल्लीमध्ये दोन वस्तीग्रह व दोन अभ्यासिका प्रारंभ करण्यात आल्या व देशभरातील upsc करणाऱ्या बहुजन विद्यार्थ्यांना दिल्लीत निवासी, अभ्यासिका व मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली.
आंबेडकरवादी मिशन चे यश
मिशन केंद्राचे 180 विद्यार्थी ias,ips,ifs,irs विविध पदावर कार्यरत आहेत.२०० विद्यार्थी एमपीएससीतर्फे वर्ग-1 व वर्ग-2 पदी निवड झाली आहे.२५० विद्यार्थी पीएसआय व केंद्रीय पीएसआय पदी निवड झाली. 60 विद्यार्थ्यांची बँक पीओ पदावर निवड झाली.
एक हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध शासकीय नोकरीमध्ये वर्ग तीन श्रेणीच्या नोकऱ्या प्राप्त झाल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा हाती घेण्यासाठी आंबेडकरवादी मिशन ची दशकातील यशस्वी वाटचालची घोडदौड चालू आहे.
विद्यार्थ्यांना केवळ अधिकारीच बनवणे नाही तर त्यांना महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारांची ओळख करून देऊन त्यांच्यात वैचारिक परिवर्तन करून घटनात्मक मूल्यावर आधारित सामाजिक न्याय देण्यासाठी म्हणून पे बॅक टू सोसायटी संदेश विद्यार्थ्यांना देण्यात येतो.
युनिव्हर्सल बुद्धिस्ट फाउंडेशन
शैक्षणिक स्पर्धात्मक प्रबोधनात्मक कार्यासोबतच दीपक कदम यांच्या नेतृत्वाखाली युनिव्हर्सल बुद्धिस्ट फाउंडेशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धम्माची संस्कारा सोबतच सेवाभावी माध्यमातून धम्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चे कार्य प्रारंभ करण्यात आले आहे.
इतर उपक्रम
देशपातळीवर संघटित बना हे अभियान दिल्ली येथून राबवण्यात आले. मूकनायक त्या शंभर वर्ष पूर्ण होण्याच्या स्थितीत 100 सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आखण्यात आले.
इंजिनिअरिंग मेडिकल इतर उच्चशिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा देण्यासाठी विविध सामाजिक संघटन व व्यक्तीच्या सहकार्याने मदतीचा हात दिला जातो.
भविष्यकालीन योजना
जागतिक स्तरावर आंबेडकरवादी विचाराच्या प्रचार व प्रसारासाठी दर्जेदार प्रकाशन ची आवश्यकता आहे त्यासाठी आगामी काळात महत्त्वाची पावले उचलली जातील. या माध्यमातून जागतिक स्तरावरील विचारवंतांना एका विचार मंचावर आणण्याचे कार्य केले जाईल.
आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात संशोधनात्मक कार्यासाठी थिंक टॅन्कची आत्यंतिक आवश्यकता आहे दिल्लीत हे कार्य उभे करण्याचा प्रयत्न आगामी काळात करण्यात येईल.
देशातील विविध राज्यात आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राच्या शाखा करण्याचा प्रयत्न केला जाईल.
धम्म आणि शिक्षा एकत्रित देण्यासाठी काही विशिष्ट उपक्रम राबवले जातील.
पंचवीस वर्षाची शैक्षणिक प्रबोधनात्मक एक विशेष कार्यक्रम राब उन जागतिक दर्जाचे उच्चशिक्षीत द बेस्ट ब्रेन, आंबेडकरवादी समाजात निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल कार्याचा.
क्लास टू मास परिवर्तनवादी चळवळ
दिपक कदम हे नेहमी आंबेडकरवादी चळवळ क्लास मध्ये शिकवून ती मास पर्यंत आणण्यासाठी योजना आखत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजाने शासनकर्ती जमात झाले पाहिजे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आजचा डीएम ऊद्याचा सीएम पीएम झाला पाहिजे या भूमिकेतून आगामी काळात आंबेडकरवादी मिशन सामाजिक राजकीय चळवळी राबवणार आहे.
कदम कुटुंबियांचा आदर्श
संभाजी केरबा जी कदम यांनी आपल्या ८२ वर्षी आपली सर्व वडिलोपार्जित जमीन, तीन घरे म्हणजेच संपूर्ण संपत्ती धम्म व सामाजिक कार्यासाठी दान दिली आहे. या दानातून नागा विहार, अभ्यासिका, ग्रंथालय, विपश्यना कक्ष ची निर्मिती कंधार येथे होणार आहे.करुणाताई तारू या मोठ्या बहिणीने मिशन केंद्रासाठी जमीन दिली, अर्चना सोनी बिदर या बहिणीने मुलींच्या वसतिगृहातील तिसरा मजला उभारण्यासाठी मदत केले. मुलगा दीपक कदम यांनी आपली तहसीलदार पदाची नोकरी सोडून समाजासाठी अविवाहित राहून संपूर्ण आयुष्य समाजाला समर्पित केले.
संपूर्ण कदम कुटुंबियांचा हा त्याग पाहून आधुनिक अनाथपिंडक ची उपमा कदम कुटुंबियांना साजेशी ठरते..
शासनकर्ती जमात हेच उद्दिष्ट
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक लोकशाही व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रक्ताचा एकही थेंब न सांडता लोकशाही मार्गाने क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी बहुजन समाजाने शासनकर्ती जमात बना हा संदेश बाबासाहेबांनी दिला, हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरून आंबेडकरवादी बहुजन समाजाला शासनकर्ती जमात करणे हेच आंबेडकरवादी मिशनचे अंतिम उद्दिष्ट आहे हे दीपक कदम यांनी स्पष्ट केले आहे...
...
प्रा. अविनाश नाईक
आंबेडकरवादी मिशन ( सांस्कृतिक विभाग)
९३२६९३२०४९/९३७०७५३०५९.