आंबेडकरवादी मिशन  सुमित धोत्रे पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यशस्वी.....दिल्लीआंबेडकरवादी मिशन चा विद्यार्थी सुमित दत्ताहरी धोत्रे हा यु पी एस सी नागरी सेवा २०२० परीक्षेत पहिल्या प्रयत्नात देशात गुणानुक्रमे 660 क्रमांकावर येऊन यशस्वी झाला. लातूरचा निलेश गायकवाड गुणानुक्रमे 629 क्रमांकावर यशस्वी झाला तर दिल्ली येथे mock  इंटरव्यू प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन तुन देशभरातील बत्तीस विद्यार्थी यशस्वी झाले.नांदेड येथील सुमित दत्ताहरी धोत्रे हा iit खरगपूर येथून इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी आपल्या पहिल्याच प्रयत्नात 660 व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला. मुख्य परीक्षेसाठी मानववंशशास्त्र हा त्याचा विषय होता त्याचे वडील संपादक आहेत तर आई प्राथमिक शिक्षिका आहेत. आंबेडकरवादी मिशन दीपक कदम यांच्या दोन वर्षापासून मार्गदर्शन घेणारा हा विद्यार्थी यशस्वी झाल्याबद्दल नांदेड परिसरामध्ये विद्यार्थी वर्गामध्ये नवीन चैतन्य व प्रेरणा निर्माण झाली. आत्यंतिक विनयपूर्वक व कठोर प्रयत्न करून सुमित मे हे यश प्राप्त केल्याचे  याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्यावर्षी आयसीडीएस या पदावर निवड झालेला निलेश गायकवाड लातूर चा विद्यार्थी 629 व्या गुन्हा क्रमांकाने या वर्षी पुन्हा यशस्वी झाला. त्याचे वडील लातूर येथे प्राचार्य पदी कार्यरत आहेत. मुंबई आयआयटीमधून एमटेक मध्ये त्याने आपले शिक्षण घेतले आहे.दिल्ली येथे mock इंटरव्यू प्रोग्राम याअंतर्गत देशपातळीवरील वरीष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी दोन महिन्याचे मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले यामध्ये आंबेडकरवादी मिशन चा सुद्धा सहभाग गेल्या सहा वर्षात असतो, त्याअंतर्गत देशपातळीवरील ३२ विद्यार्थी या वर्षी यूपीसी मध्ये यशस्वी झाल्याचे दीपक कदम यांनी स्पष्ट केले.Sent

Popular posts from this blog

दीपक कदम यांना मी ' साहेब म्हणतो..... डॉ.भालचंद्र मुणगेकर

T 15 ... कॉलरवाली माताराम वाघीण.

आंबेडकरवादी मिशन मध्ये निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग