दीपक कदम यांना मी ' साहेब म्हणतो..... डॉ.भालचंद्र मुणगेकर
आंबेडकरवादी मिशन ला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. भालचंद्र मुणगेकर. दिपक कदम हे माझ्यापेक्षा वयाने माझा पेक्षा खूप लहान आहेत पण मी त्यांना साहेब म्हणतो, मी मुळात wप्राध्यापक असल्यामुळे मी कोणालाही सहाजा सहजी साहेब म्हणत नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांना साहेब म्हणले जाते . पण तहसीलदार पदाचा त्याग करून सर्वसामान्य कामगार यांच्या सहकार्याने नांदेड येथे आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राची भव्य यंत्रणा उभी करून तीनशे विद्यार्थ्यांना निवासाची स्पर्धात्मक अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून दिली आहे, ही त्यांची प्रत्यक्ष कृती आत्यंतिक महत्त्वपूर्ण आहे म्हणून मी त्यांना कृतज्ञता पूर्वक साहेब म्हणतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरा वर अनेक लोक भाषणे करतात अनेक लोक बोलतात पण प्रत्यक्ष कृती फार कमी लोक करतात त्यामध्ये दीपक कदम यांचा समावेश आहे त्यांनी कृतीमधून ही यंत्रणा उभी करून संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीची यंत्रणा सरकारच्या किंवा राजकीय मदतीविना उभारू शकतो याचे एक यशस्वी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. ...